Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावाकडे परतलेल्या मजुरांची तपासणीसाठी पहूर ग्रामीण रूग्णालयात धाव

पहूर,ता .जामनेर प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे परगावी गेलेले मजुरांचे तांडे आता आपल्या मुळ गावी परतत असून आरोग्य तपासणीसाठी त्यांची पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.

शेंदुर्णी येथील रहिवासी असलेल्या ११ संशयीतांची तपासणी करण्यात पहूर ग्रामीण रुग्णालयाकडून झालेल्या दिरंगाईच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सकाळपासूनच वैद्यकीय यंत्रणा सज्ज होती. उसतोड कामगार, वीटभट्टीवर काम करणारे मजूर, कंपन्यांमध्ये काम करणारे लोक आपल्या गावी परतत आहेत. त्यांची तपासणी ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत आहे. तसेच आपल्या गावी परतण्यासाठी पहूर परिसरात अडकून पडलेल्या सुमारे ३०० जणांची ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात येऊन त्यांना मुळ गावी सोडण्यात आले. १९० जण पर जिल्ह्यातून आलेले असून उर्वरीत जण पहूर परिसरातून त्यांच्या गावी जाणार आहेत . त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून होमकॉरंटाईन चा सल्ला देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.हर्षल चांदा, डॉ. जितेंद्र वानखेडे, डॉ. संदीप कुमावत यांनी दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version