Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावठी पिस्तूल व दोन काडतुसांसह संशयिताला अटक

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील फॉरेस्ट नाक्याजवळ गावठी पिस्तूल व दोन काडतुसे  घेऊन फिरणाऱ्या तरुणाला चोपडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे हस्तगत केले आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासूकुमार हरीशकुमार सेनठाकूर (वय -२०, राहणार यिकाडे ता. सरदाना जि.मेरठ उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा शहरातील सत्रासेन फॉरेस्ट नाक्याजवळ एक तरुण गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस  घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाणे यांनी कारवाई करत संशयित आरोपी वासूकुमार हरेशकुमार सेनठाकूर याला ताब्यात घेतले. त्याची अंग झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर हे करीत आहे.

Exit mobile version