Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावठी कट्टा बाळगणार्‍या दोघांना २८ पर्यंत पोलीस कोठडी

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ तसेच तालुक्यातील वराडसीम येथील दोघांना गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, वराडसीम येथे गावठी कट्टा बाळगल्याच्या प्रकरणी याआधी राजेश रमेश तायडे (वय २७, रा.पाडळसे, ह.मु.असोदा) व सचिन संतोष सपकाळे (वय २६, रा. वराडसिम) यांनी अटक करण्यात आली होती. यानंतर राजू टाक (रा. वाल्मिक नगर भुसावळ) व मयूर कैलास सपकाळे रा. वराडसीम या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता २८ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Exit mobile version