Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावच्या कारभार्‍यांच्या हाती – विकासाची गती : ना. गुलाबराव पाटील

धरणगाव, प्रतिनिधी | गाव कारभार्‍यांचा कारभार चांगला असल्यास गावचा विकास गतीने होतो. ” आमचं गाव, आमची एकी, अजून बरंच काम बाकी ” हा ध्यास घेऊन काम केलेल्या कारभार्‍यांच्या गावांनी विकासाचे तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रात लौकीक मिळविला आहे. प्रत्येक गाव कारभाऱ्यानी निर्धार केल्यास आदर्श गाव होऊ शकते. हाच निर्धार सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी करावा असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

ना. गुलाबराव पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यांनी विकासाचा निर्धार करण्याचे आवाहन केले. टीकाकारांनी टिका करण्या आधी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे सांगितले. हिंगोणे गावाला व्यायामशाळा साठी 10 लक्ष, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 22 लाख मंजूर करणार असल्याचे सांगून पिंप्रीसह परिसरातील गावांचा चौफेर आणि शाश्‍वत विकास साधण्यासाठी आपण निधीत कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. पालकमंत्र्यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयासह परिसरातील रस्त्यांसह विविध विकासकामांचे भूमिपुजन आज करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना ना. पाटील यांनी ग्राम विकासाला चालना देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात पिंप्रीसह परिसरात तब्बल अडीच कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपुजन करण्यात आले.

ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते पिंप्री खुर्द परिसरातील कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यात पिंप्री खुर्द येथील ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम – २० लाख; गावातील अयोध्यानगर भागात पेव्हर ब्लॉक बसविणे- ६ लक्ष; भोद बुद्रुक ते माळपिंप्री रस्ता डांबरीकरण करणे – १ कोटी ३४ लक्ष रूपये; भोद बुद्रुक येथील स्मशानभूमिचे बांधकाम आणि सुशोभीकरण करणे – ७ लक्ष; हिंगोणे बुद्रुक ते माळपिंप्री प्र.चा. या रस्त्यांचे डांबरीकरण करणे – २० लक्ष आणि हिंगोणे बुद्रुक येथे साठवण बंधारा बांधकाम करणे – ६५ लक्ष अशा विविध विकास कामांचे भूमिपुजन ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवसेना शाखेचे उदघाटन व प्रवेश सोहळा

यावेळी शिवसेना शाखेचे उदघाटन ना. गुलाबराव पाटील व मान्यवरांनी यांनी केले. हिंगोणे येथील, उपसरपंच जितेंद्र पाटील, ग्रा. पं. सदस्य विनय पाटील, योगेश पाटील, मोहन पाटील, किशोर पाटील, निलेश महाजन यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सर्वांचे स्वागत पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील व सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. प्रसंगी शिवसेना झिंदाबाद व बाळासाहेब यांचा विजय असो, जय भवानी – जय शिवाजी अश्या घोषणा परिसर निनादला.

या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, विभाग प्रमुख टिकाराम पाटील, सोपान पाटील, पिंप्री सरपंच नाना बडगुजर, नाना भालेराव, सोसायटी चेअरमन शंकर बडगुजर , डी. ओ.पाटील, रविंद्र चव्हाण, अनिल पाटील, मंगल अण्णा पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, भोद सरपंच राजेंद्र पाटील, रतीलाल पाटील,बाम्भोरी सरपंच भिकन ननवरे , कल्याणे सरपंच संदीप पाटील, हनुमंतखेडा सरपंच हुकूमचंद पाटील, माजी सभापती नवल बोरसे,दामुनाना पाटील, वाघळूद सरपंच सूकदेव पाटील, युवासेनेचे अमोल पाटील, विका सोसायटीचे चेअरमन गजानन पाटील, हिंगोणे सरपंच वंदना पाटील, उपसरपंच अक्षय सोनवणे, संजय पाटील यांच्यासह परीसरातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी हिंगोणे ग्रामपंचायत व विका सोसायटीच्या मार्फत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संजय बोरसे यांनी केले तर आभार विवेक सपकाळे यांनी मानले.

Exit mobile version