Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावकऱ्यांच्या सहभागाशिवाय शाळेची प्रगती होवू शकत नाही – विजय सरोदे

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गावकऱ्यांच्या सहभागा शिवाय गावातील शाळेची प्रगती होवू शकत नाही असे शिक्षणविस्तार अधिकारी विजय सरोदे  यांनी टाकरखेडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रेरणा सभेच्यावेळी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

 

विजय सरोदे  यांनी पालकांसमोर बोलतांना सांगितले की, टाकरखेडा शाळेची निवड ही बाला उपक्रम तसेच आदर्श  शाळेसाठी झालेली आहे. बाला उपक्रमामुळे शाळेची गुणवत्ता वाढीस लागते. त्यासाठी पालकांनी तसेच ग्रामस्थांनी आर्थिक सहकार्य करावे. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी बाला उपक्रम राबवणे गरजेचे आहे. शाळेच्या भौतिक सुविधा पुर्ण करण्यासाठी पालकांचा तसेच ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे.गावाच्या सहकार्यामुळे कोणतेही अशक्य काम हे शक्य होते. प्रमुख अतिथी म्हणून  विष्णु विठ्ठल काळे , शालेय पोषण आहार अधिक्षक पं. स. जामनेर यांनी पालकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, बाला उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची अध्ययनाची प्रकिया सुलभ होते व दिर्घकाळ विद्यार्थ्यांनाच्या स्मरणात राहते. टाकरखेडा शाळेची आदर्श शाळा म्हणून जामनेर तालुक्यातून निवड होणे हे विशेष आहे. याप्रसंगी विजय सरोदे तसेच विष्णू काळे यांनी प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे रोख स्वरूपात देणगी दिली.  कार्यक्रमास उपसरपंच धर्मराज शिंदे , सदस्य प्रकाश पाटील, अर्जुन पाटील, पोलीस पाटील समाधान मुरलीधर पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर,माजी सरपंच समाधान पाटील, उपाध्यक्ष रुपाली आगळे, सदस्य शिवाजी डोंगरे, विलास साळुंके, भरत उघडे, सुधाकर गोसावी, पालक वामनराव उघडे, निवृत्ती आगळे, आत्माराम सुरळकर, बाळु सुरळकर , श्रीपत  भोई, अमृत दांडगे, लक्ष्मी भोई, श्रावण भोई हरिदास उघडे  अभिमान पडोळ, ईश्वर ठाकूर, श्रीकृष्ण पुराणे, रतिलाल भोई, विलास भोई आदी उपस्थित होते.  प्रास्ताविक उपशिक्षक जयंत शेळके यांनी केले. सूत्रसंचालन देवाजी पाटील यांनी केले व आभार शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी तसेच शाळेतील उपशिक्षक रविंद्र चौधरी, शांताराम पाटील, रामेश्वर आहेर यांनी कामकाज पाहिलं.

Exit mobile version