याबाबत अधिक माहिती अशी की, शेख अक्रम शेख करीम रा. गेंदालाल मिल, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी ५ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एमएच ०२ सीडी ४९७६) ने शहरातील गुजराल पेट्रोल पंपांजवळ कारचा वाहन क्रमांक (एमएच १९ बीझेड ४७४७) ला कट लागला. या रागातून पवन राजेंद्र ठाकरे रा. निमखेडी रा. जळगाव याने शेख अक्रम यांना शिवीगाळ केली. तर कारच्या काचा फोडून नुकसान केले. याप्रकरणी सोमवारी ६ जून रोजी रात्री ९ वाजता पवन राजेंद्र ठाकरे याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.