Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गाईच्या गोमूत्र व शेणापासून तयार केलेल्या उत्पादनांचे लोकार्पण

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री जगन्नाथ गोशाळेच्या माध्यमातून गाईचे शेण व गोमूत्रापासून जगन्माता निष्कलंक गोवरी, जगन्माता निष्कलंक सुगंधित धूप तसेच अगरबत्ती या नैसर्गिक व पर्यावरण पूरक गुणधर्म उत्पादनाचे लोकार्पण संत महात्म्यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी परमपूज्य श्री राधे राधे बाबा, परमपूज्य श्री सुरेश शास्त्री मानेकर बाबा, सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज याच्यासह आदी संत महात्म्ये उपस्थित होते. हा कार्यक्रम यावल तालुक्यातील वाढोदा येथील निष्कलंक धाम येथे भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आले. श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते तसेच संजीवनी ब्लड बँकेचे संचालक यांनी मिळून हे उत्पादन तयार केले आहे. या महत्त्वपूर्ण व आगळ्यावेगळ्या प्रकल्पाच्या उत्पादनातून मिळणारा पैसा जगन्नाथ गोशाळेसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. या उत्पादनाचे लोकार्पण समरसता महाकुंभाच्या पवित्रभूमीवर करण्यात आले. यावेळी सनातन सतपंथ परिवारातील असंख्य कार्यकर्ते व संत महंत उपस्थित होते.

Exit mobile version