Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गांधी मार्केटजवळ तरूणावर धारदार पट्टीने वार; जिल्हा रूग्णालयात दाखल

जळगाव प्रतिनिधी । वेफर्सचे पैसे मागितले म्हणून गांधी मार्केटजवळ दुकानदाराच्या चेहऱ्यावर नशेत असलेल्या तरूणाने धारदार पट्टीने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज सायंकाळी घडली. जखमी विक्रेत्याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

विजय आत्मारात भोई (वय-30, रा. शाहूनगर) असे वेफर्स विक्रेता तरूणाचे नाव आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शाहूनगरातील रहिवासी विजय आत्माराम भोई हा तरुण गांधी मार्केटच्या बाहेर वेफर्स विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावतो. आज दुपारच्या सुमारास बाळू नावाचा तरुण याठिकाणी आला. त्याने विजयला वेफर्स मागितले असता त्याने वेफर्स घेतले परंतु त्याला पैसे न देता उलट त्याला शिवीगाळ करु लागला. यावेळी दोघांमध्ये किरकोळ वाद झाल्याने विजय हा तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात आला. पोलिसांनी बाळू नामक तरुणाला देखील यावेळी पोलिस ठाण्यात आणले. परंतु यावेळी पोलिसांकडून दोघांना समज देवून त्यांना परत पाठवून देण्यात आले असल्याचे विजयने पोलिस अधिकार्‍यांना सांगितले. सायंकाळच्या सुमारास बाळू हा पुन्हा गांजाच्या नशेत विजयकडे आला आणि त्याला पुन्हा शिवीगाळ करु लागला. यावेळी विजयने पोलिस ठाण्यात फोन करीत हा मला पुन्हा शिवीगाळ करीत असल्याचे सांगताच बाळूने त्याच्याकडील धारदार पट्टीने विजयच्या चेहर्‍यावर वार करीत त्याला जखमी करीत बाळू घटनास्थळहून पसार झाला.

धारदार पट्टीने विजयच्या चेहर्‍याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेतच इतर विक्रेत्यांनी विजयला शहर पोलिस ठाण्यात आणले. यावेळी विजयचे संपुर्ण कपडे रक्ताने माखले होते. दरम्यान विजयच्या चेहर्‍यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी विजयवर उपचार सुरु असून त्याच्या चेहर्‍यावर गंभीर जखमा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version