Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गांधी उद्यानाजवळ टायगर ग्रुपतर्फे रक्तदान शिबीर (व्हिडिओ )

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गांधी उद्यानाजवळ टायगर ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ऋषिकेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना रक्ताची गरज भासत आहे. वाढदिवसाची मोठा गजावाजा न करता टायगर गृपतर्फे रक्तदान शिबीर गांधी उद्यानाजवळील विवेकानंद व्यायाम शाळेत करण्यात आले होते. याप्रसंगी ६० रक्तदात्यांनी केले. आज सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे. यावेळी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले, या कार्यासाठी टायगर ग्रुपचे कार्यकर्ते योगेश कोळी, गौरव उमप, सागर सपके, जितू निंबाळकर, सोपान मानकर, मनोज बाविस्कर, प्रणव शर्मा, कुणाल बारी, नंदलाल मराठे, अंकुश मराठे, राहुल उमप आदींचे सहकार्य लाभले. तर रेडप्लस रक्तपेढीचे भरत गायकवाड, अभिषेक शेटे, अमोल शेलार, विवेक महाजन आणि प्रमोद पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version