Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गांधीतीर्थला एकदा तरी भेट द्यावी- ना. सुनील केदार

sunil kedar gandhi teerth jalgaon

जळगाव प्रतिनिधी । जैन हिल्सवरील गांधी तीर्थमध्ये महात्मा गांधी यांच्याशी संबंधीत बाबींना एकाच ठिकाणी विलक्षण पध्दतीत साकार करण्यात आले असून याला नागरिकांनी एकदा तरी भेट द्यावी असे आवाहन पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. सुनील केदार यांनी केले. गांधी तीर्थ पाहिल्यानंतर ते बोलत होते.

राष्ट्रपिता गांधीजीचे म्युझियम पाहण्यासाठी आपल्या शिष्टमंडळासह ते जैन हिल्स येथे आले होते. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याशीही त्यांची विशेष भेट झाली. त्यांचे स्वागत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, मार्केटिंग विभाग प्रमुख अभय जैन यांनी केले. सकाळी त्यांनी श्रद्धाधाम, परिश्रम, मोसंबीची बाग, एरोपोनिक्स बटाटा लागवड प्रयोग, सिट्रस संशोधनला भेट दिली. या वेळी अभय जैन, जैन इरिगेशनचे सहकारी के. बी. पाटील, सोमनाथ जाधव यांनी कंपनीच्या संशोधन, विकास कार्याबाबत माहिती दिली. गांधी तीर्थबद्दल त्यांना उदय महाजन, आश्‍विन झालांनी माहिती दिली. यानंतर ते म्हणाले की, खोज गांधीजी की या ऑडिओ गाईडेड म्युझियमला भेट देऊन महात्मा गांधीजींचे जीवनचरित्र अगदी कमी वेळात समजते अशा मोठ्या कल्पक पद्धतीने ते बनवण्यात आलेले आहे. गांधीतीर्थला मी काही तरी नवीन शिकण्यासाठी आलो व शिकून चाललो आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली.

Exit mobile version