Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गांधीजींचे विचार पोहचवण्यासाठी पुढाकार घ्या- शोभा बच्छाव

पारोळा । महात्मा गांधी यांचा विचार समाजात पोहचवून समता व बंधुता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री तथा काँग्रेसच्या जिल्हा प्रभारी डॉ.शोभा बच्छाव यांनी केले. त्या येथील काँग्रेस समितीतर्फे आयोजित एकता संमेलनात बोलत होत्या.

पारोळा येथे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकता संमेलनाचे आयोजन केले होते. अध्यक्षपदी माजी आरोग्य मंत्री डॉ.शोभा बच्छाव होत्या. त्यांनी काँग्रेस पक्ष भेदभाव न करता सर्वांना सामावून घेणारा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्ष विस्तारासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे सांगितले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान, जिल्हा उपाध्यक्ष रामराव पाटील, उमेश पाटील, नामदेव महाजन, मनोहर पाटील, बी.जी.पाटील, अनिल अनुष्ठान, दशरथ अहिर, बापू वाडीले, सुरेश पाटोळ यांची उपस्थिती होती.

Exit mobile version