Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गहू २ रूपयांनी तर तांदूळ ३ रूपयांनी देणार ; केंद्रीयमंत्री जावडेकरांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गहू २ रूपयांनी तर तांदूळ ३ रूपयांनी देणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज एका पत्रकार परिषदमध्ये केली.

 

जावडेकर यांनी सांगितले की, केंद्र सरकार ८० कोटी लोकांना २७ रुपये किलोचा गहू २ रुपये किलोने देणार तर ३७ रुपये किलोचा तांदूळ ३ रुपये किलोने देणार आहे. सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही पगार दिला जाईल. खासगी कंपन्याही यासाठी सकारात्मक आहेत. असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. करोनाशी लढण्यासाठी तीन ते चारच उपाय आहेत. घरातच थांबा, काहीही काम केले की हात धुवा, ताप, सर्दी, खोकला वाढला तर लगेच डॉक्टरांकडे जा. तसेच सोशल डिस्टसिंग हे मोजकेच उपाय आहेत. ते सगळ्यांनी अवलंबावेत असेही जावडेकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version