Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गवळीवाड्यात किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक; एक महिला जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन जणांना किरकोळ भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होवून तुफान दगडफेक करण्यात आल्याची घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील गवळीवाड्यात घडली. यात एक महिला जखमी झाली असून त्याना रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरातील गवळीवाडा येथील मश्चिबाजार समोर मंगळवार रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दोन जणांनामध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून दोघांनी एकमेकांच्या एरियातील तरूणांना बोलावून घेतले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने हाणामारी होवून तुफान दगडफेक करण्यात आली. यामध्ये स्थानिक रहिवाश्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. तर या दगडफेकीत एक महिला जखमी झाले आहे. जखमी महिलेला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान गवळीवाड्यात दगडफेक झाल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेवून परिस्थिती आटोक्यात आणली आहे. घटनास्थळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे हे घटनास्थळी दाखल झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गवळीवाड्यासह परिसरात तणावपुर्ण शांतता असून दोन्ही गटातील संशयित आरोपींचे चौकशीचे काम पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version