Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गळफास घेतल्याने विवाहितेचा मृत्यू

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या एका २० वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काजल गणेश राठोड (वय-२०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, काजल राठोड ह्या आपल्या परिवारासह आपल्या रामेश्वर कॉलनी वास्तव्याला होत्या. सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काजल राठोड यांनी राहत्या घरात कुणही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. त्यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

दरम्यान, हा प्रकार कुटुंबियाला समजल्यानंतर त्यांनी तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल सोनवणे यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोकॉ स्वप्निल पाटील करीत आहे.

Exit mobile version