Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गर्भवती महिलांसाठी कोरोना लसीकरणाबद्दल आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक तत्त्वे जारी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केल्या जात आहे.  आता आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना लस देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत.

 

“गर्भधारणेमुळे संक्रमणाचा धोका वाढत नाही. पण बहुतेक गर्भवती स्त्रियांना लक्षणे नसतील किंवा सौम्य आजार असतील तर त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडू शकते. त्यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो. कोविडच्या संसर्गापासून स्वत: ला वाचवण्यासाठी त्यांनी सर्व सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यामुळे गर्भवती महिलांनी आधीच कोरोना लस घ्यावी,” असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला होता.

 

मंत्रालयाने मार्गदर्शक सुचनेत म्हटले आहे की, लस सुरक्षित आहे आणि कोविडपासून गर्भवती महिलांचे संरक्षण करते. कोणत्याही औषधाप्रमाणेच, लसीचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात जे सहसा सौम्य असतात. जसे की सौम्य ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होणे किंवा लसीकरणानंतर १-३ दिवसांपर्यंत अस्वस्थता जाणवते. लसीकरणानंतर २० दिवसात फारच कमी गर्भवती महिलांमध्ये काही लक्षणे दिसू शकतात, ज्यावर त्वरित लक्ष देण्याची गरज असते.” तसेच जर एखाद्या महिलेस गर्भधारणेदरम्यान कोविडची लागण झाली असेल, तर प्रसूतीनंतर लगेचच लसीकरण करावे, असे देखील मंत्रालयाने मार्गदर्शक सुचनेत सांगितले आहे.

 

गर्भवती महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली तर त्यातील ९० टक्के महिला रुग्णालयात दाखल न होता घरीच बऱ्या होतात. तिव्र लक्षणे असलेल्या महिलांना रुग्णालयात दाखल करावे लागते. कोविडमुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

 

मुलांच्या आरोग्याबद्दल असलेल्या भीतींविषयी मंत्रालयाने मार्गदर्शक सुचनेत माहिती दिली. “कोरोना पॉझिटिव्ह मातांपैकी ९५ टक्के पेक्षा जास्त नवजात बाळ जन्मतःच चांगल्या स्थितीत होते. काही वेळी कोरोना संसर्गामुळे वेळे आधी प्रसूती होण्याचा धोका वाढवू शकतो. तसेच मुलाचे वजन २.५ किलोपेक्षा कमी असू शकते.”

 

Exit mobile version