Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गर्भवती प्रेयसीची प्रियकराकडून हत्या !

पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यातील प्रियकराने आपल्या गर्भवती प्रेयसीची हत्या केल्याची खळबळजनक घटना रांजणगावात घडली आहे. सोनामनी सोरेन असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रेयसीचा गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपी पोलीस स्टेशनला स्वतः हजर झाला होता.

 

 

किरण फुंदे असे आरोपी प्रियकराचे नाव असून त्याने प्रेयसी सोनामनी सोरेन हिची हत्या केल्याचा आरोप आहे कारेगावमध्ये किरण फुंदे आणि सोनामनी सोरेन हे दोघे एकत्र रहात होते. सोनामनी गर्भवती झाल्याने दोघांमध्ये वाद उद्भवला. याच वादातून किरणने राहत्या घरी सोनामनीचा गळा आवाळून हत्या केली आणि घराला बाहेरुन कुलूप लावून तो थेट रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. हत्या केल्याची कबुली देत आपण केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून फाशी द्या, असे लिहिलेला कागद त्याने पोलिसांकडे सुपूर्द केला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Exit mobile version