Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गर्भवती पत्नीची जवानाकडून हत्या, स्वतःही केली गोळी झाडून आत्महत्या

पुलगाव (वृत्तसंस्था) गर्भवती पत्नीची गोळी झाडत हत्या करत एका सैनिकाने स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

मृत सैनिकाचे नाव अजय कुमार सिंह (25) आणि मृत पत्नीचे नाव प्रियंका कुमारी (26) आहे. हे दोघेही मूळचे बिहार राज्यातले आहेत. दोन वर्षांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. तर पत्नी गरोदर होती. सैनिक ड्युटीवरून पाणी पिण्याच्या बहाण्याने गायब होत घरी आला. त्यानंतर त्याने इन्सास रायफलने गर्भवती पत्नीवर गोळी झाडत हत्या केली. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पतीचाही सावंगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.दरम्यान, हत्या आणि आत्महत्येचे नेमकं कारण समोर आले नसून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

Exit mobile version