Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : निती आयोगाने केले आवाहन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशभरात एच३एन२  इन्फ्लुएंझा विकाराची साथ वाढत असतांना आता निती आयोगाने देशातील नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

 

याबाबतचे वृत्त असे की, तीन वर्षापूर्वी याच दिवसांमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू झाला होता. यानंतर सर्वांनाच पुढील किमान दोन वर्षे मास्क वापरावा लागला होता. गेल्या सव्वा वर्षांपासून मास्क सक्ती रद्द करण्यात आलेली आहे. तथापि, आता आपल्याला किमान सार्वजनीक गर्दीच्या ठिकाणी तरी मास्क वापरावा लागणार आहे. अर्थात, हा निर्णय ऐच्छीक असला तरी याची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा निती आयोगाने केली आहे.

 

देशभरात सध्या एच३एन२  इन्फ्लुएंझा अर्थात फ्ल्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. याचा प्रसार प्रचंड गतीने होत असून लक्षावधींना याची बाधा झाल्याचे मानले जात आहे. ही व्याधी कोरोना इतकी घातक नसली तरी देखील लोकांनी याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याचमुळे निती आयोगाने देशातील नागरिकांनी सार्वजनीक गर्दीच्या ठिकाणी तरी मास्क वापरावा असे निर्देश आज जारी केले आहेत.

Exit mobile version