Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गरोदर महिलांसाठी कोरोनावरील लस सुरक्षित

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था । निति आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी गरोदर महिलांनी कोरोनाची लस घ्यावी, असं आवाहन केलं आहे. लस घेतल्याने गरोदर महिला आणि बाळाला सुरक्षा मिळेल आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार ही लस गरोदर  महिलासाठी  सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

 

देशात  दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर जोर देण्यात आला आहे. यासाठी १८ वर्षावरील सर्वांचं लसीकरण केलं जात आहे. गरोदर आणि स्तनदा मातांना २ जुलैपासून   लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी गरोदर महिलांनी लस घ्यावी, की नाही? याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जात होते.

 

“गरोदर महिलांना  लागण झाली तर त्याचे परिणाम होणाऱ्या बाळावर होऊ शकतात. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना जारी केल्या आहेत. गरोदर महिलांनी लस घेतली पाहीजे. लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. गरोदर महिलेला लागण झाल्यास वेळेआधी प्रसुती होण्याची शक्यता जास्त आहे. असं एका अभ्यासातून समोर आलं आहे”, असं डॉक्टर पॉल यांनी सांगितलं.

 

 

गरोदर महिला कोविन अॅपवरून बुकिंग किंवा थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात, असंही त्यांनी पुढे सांगितलं. सर्वसामान्यांनी लस घेण्यापूर्वी जी काळजी घ्यावी, तीच काळजी गरोदर महिलांनी घेतली पाहिजे.

 

मागील २४ तासात देशभरात ४४ हजार ४५९ रूग्ण बरे झाले , ४३ हजार ३९३ नवीन बाधित आढळून आले आहेत. देशात ९११ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०७,५२,९५० झाली आहे.

Exit mobile version