Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गरुड महाविद्यालयाची धुरा डॉ. वासुदेव पाटील यांच्या हाती

शेंदुर्णी, प्रतिनिधी | येथील धी शेंदूर्णी सेकं.एज्यु.को ऑप् सो. लि. शेंदूर्णी संचलित अप्पासाहेब र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा पुन्हा डॉ.वासुदेव आर.पाटील यांच्या हाती संस्थेच्या वतीने सोपविण्यात आली.

 

प्रथम पाच वर्षांची टर्म पूर्ण केल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार पून्हा मुलाखत घेण्यात येऊन त्यांची नेमणूक संस्थेच्या वतीने डॉ.वासुदेव पाटील यांची पुन्हा पाच वर्षांसाठी करण्यात आली. प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत आहे. पुढील पाच वर्षात महाविद्यालय अजून उत्तुंग शिखरावर नेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवीन उपक्रम, iso मानांकन व न्याक मूल्यांकनात चांगले यश मिळविण्याचा त्यांचा मानस आहे. या नियुक्तीमुळे पुन्हा सक्षम नेतृत्वाखाली महाविद्यालयाची प्रगती होईल असा आशावाद व्यक्त करुन संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड,संस्थेचे सचिव सतिश चंद्र काशीद, महिला संचालिका उज्ज्वला काशीद,जेष्ठ मार्गदर्शक सगरमल जैन, सहसचिव दिपक गरुड, वसतिगृह सचिव कैलास देशमुख व यु. यु.पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version