Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गरीब जनतेची हेळसांड होऊ नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात प्रत्येकी   ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा ८० कोटी नागरिकांना फायदा होणार आहे.

 

देशात कोरोनामुळे पुन्हा एकदा स्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.   काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत.   या निर्णयामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार २६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

 

आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरीबांच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले होते. या पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून दर महिन्याला दरडोई पाच किलो गहू अथवा तांदूळ मोफत देण्यात येत होतं. या योजनेतल्या जवळपास ८० कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्यात आलं होतं. आता पुन्हा तीच स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटाच्या काळामध्ये पुन्हा एकदा सरकारनं दोन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

नोव्हेंबर २०२० पासून केंद्र शासनानं पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केली होती. आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवल्यानं गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Exit mobile version