Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गरिबांना मोफत लस ; १ मेरोजी निर्णयाची शक्यता

 

पुणे : वृत्तसंस्था । राज्यातील गरीब जनतेला मोफत लस देण्याचा राज्य सरकार विचार करत असून लवकरच निर्णय घेतला जाईल, येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. पुण्यात त्यांनी ही माहिती दिली

 

देशभरात रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, काही भागात लसीचे डोस यांचा तुटवडा  आहे. एकीकडे रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढतच असताना दुसरीकडे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातल्या सर्वांना लसीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. लसीचे डोस अपुरे पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून १८ ते ४४ वयोगटातल्या सधन नागरिकांना लस विकतच घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

 

मोफत लसीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री १ मे रोजी भूमिका जाहीर करणार आहेत. त्याबद्दल तेव्हाच सांगितलं जाईल. पूनावाला म्हणाले आत्ता मी तुम्हाला इतकी लस देऊ शकणार नाही. त्यांनी सांगितलं की माझ्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला लस देईन. उरलेली लस तुम्ही इतर कंपन्यांकडून घ्या. सध्या ते इंग्लंडला गेले आहेत. ते परत आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू”, अस  ते म्हणाले.

 

येत्या काळात रेमडेसिविर आणि लसींची वाढती मागणी लक्षात घेता आता राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रेमडेसिविर आणि  ज्या ज्या लसींना देशात मान्यता मिळाली आहे, त्या लसींच्या पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हि माहिती दिली

ग्लोबल टेंडरची प्रक्रिया येत्या १ मे पासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. “आज काही निर्णय घेतले आहेत. १८ ते ४४ वयोगटातल्या लोकांना व्हॅक्सिन देण्यासाठी केंद्राचं म्हणणं आहे की राज्यांनी ही जबाबदारी घ्यावी. राज्यांचं म्हणणंय केंद्रानं ती जबाबदारी घ्यावी. पण टोलवाटोलवी करून चालणार नाही. आम्ही त्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ५ जणांची कमिटी स्थापन केली आहे. त्यात मुख्य सचिव अध्यक्ष असतील. त्यांच्यासोबत, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त, सार्वजनिक आरोग्याचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षणचे सचिव आणि उद्योग खात्याचे सचिव त्याचे सदस्य असतील. टेंडर काढायच्या सूचना सीताराम कुंटेंना दिल्या आहेत”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

 

टेंडरबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात आल्याची माहिती देखील अजित पवारांनी दिली. “रेमडेसिविर इंजेक्शन आणि जे जे व्हॅक्सिन दिले जात आहेत त्या सगळ्यांसाठी हे टेंडर असेल. यातून रेमडेसिविर आणि व्हॅक्सिन या दोन्हींचं काम होईल. १ मे पासून ते सुरू करण्याची तयारी आपण केली आहे. मंत्रिमंडळाने निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार मुख्य सचिवांना दिले आहेत”, असं ते म्हणाले.

Exit mobile version