Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गरजूंपर्यत पोहचण्यासाठी महसूल प्रशासनाने केले मदतीचे हात सक्रीय

रावेर, प्रतिनिधी । रावेर शहरासह ग्रामीण भागात गरजु गरीब कुटुंबा पर्यंत अन्न-धान्य पोहचविण्यासाठी महसूल प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. आवश्यक किट्स बनवुन तहसिलदारांच्या हस्ते वाटप केले जात आहे. तर अनेक सामाजिक संघटना,संस्था महसूलने सक्रीय केले आहे.त्यामुळे गरीबां विषयी आपुलकी असलेले लोक स्वतःहून पुढे येत असून मदत करण्यात हातभार लावत आहे.

रविवारी जीवनावश्यक वस्तु किट तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते आदिवासी भागात वाटप करण्यात आले. तर आज सोमवारी तहसिलदार सावदा शहर येथे भेट देणार असून रेशनवर धान्य वाटपाची पाहणी करणार आहे. त्यांच्या या ताबड-तोड तालुक्यांच्या दौऱ्यामुळे आता अनेक सामाजिक संघटना सक्रीय झाल्या असून गरजुपर्यंत किट अन्न धान्य वाटप करत आहे. येथील राष्ट्रवादी शहरध्यक्ष महेमुद शेख सांगतात की, मी तहसिलदारांची प्रेरणा घेऊन गावात स्वतःच गरजुपर्यंत अन्न-धान्य वाटप केले. तर शहरात लोकांना सॅनिटायझर वाटप केले. यामध्ये अनेक हिंदू-मुस्लिम सामाजिक संघटना संस्था,कोरोना सारख्या जिवघेण्या वायरस विरुध्द गरीबांना मदतीच्या भावानेतुन लढत आहे. तालुकाभरात महसूल प्रशासनाने अनेक मदतीचे हात सक्रीय केल्याने या मदतीने कोणाच्या डोळ्यातले अश्रु पुसले गेले तर कोणाच्या पोटाची भूक शांत झालेली दिसत होती.

Exit mobile version