Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेश विसर्जनासाठी शेंदुर्णीत कृत्रिम तलाव

शेंदुर्णी, प्रतिनिधी  । गणेश विसर्जनासाठी शेंदुर्णी नगरपंचायतीने उभारलेल्या कृत्रिम तलावात सकाळपासून भाविक भक्तिभावाने श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करत आहेत.

प्रतिष्ठापना केलेल्या अनेक मूर्ती पीओपीच्या असल्याने त्या पाण्यात लगेचच विरघळत नाहीत. विसर्जनानंतर मूर्तींची विटंबना होते. यासोबतच नदी व पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. तसेच  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने राज्य शासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शेंदूर्णीत कृत्रिम तलावात श्री गणेश विसर्जनाची तयारी नगरपंचायतने केली आहे. त्यासाठी नगरपंचायत कार्यालयाजवळ  कृत्रिम तलाव करण्यात येवून  निर्माल्य संकलन वाहन सज्ज ठेवण्यात आले आहे.  संकलित होणारे निर्माल्यातून  खत निर्मिती करण्यात येणार आहे.  संकलन केलेल्या गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. . राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार,भाविक विसर्जनस्थळी गणेश मुर्त्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करत आहेत. या संकलित गणेश मुर्त्यांचे विसर्जन न. प. कर्मचारी करत आहेत. नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे. तसेच भाविकांनी गोंदेगाव धरण लीहा तांडा पूल व सोयगांव रोड चुनाभट्टी नदीच्या काठावर न प कर्मचाऱ्यांकडे निर्माल्य संकलन करावे. शेंदुर्णी  नगरपंचायत मार्फत उभारलेल्या  कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करावे असे आवाहन मुख्याधिकारी  साजिद पिंजारी यांनी केले आहे.  सर्वानी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा निश्‍चय करावा. पर्यावरणपुरकच बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करत पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करावी  असे आवाहन  नगराध्यक्षा विजयाताई खलसे यांनी केले. नागरिकांनी रस्त्यावर अथवा विसर्जन ठिकाणी गर्दी होणार नाही व कोरोना प्रतिबंध होईल यासाठी ही व्यवस्था करण्यात आलीय.

Exit mobile version