Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेश मंडळाच्या ॲम्प्लिफायर, स्पीकरसह लाईटची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा शिवारातील शालीनी नगरात असलेल्या श्री साई गणेश मित्र मंडळाच्या गणपती स्थापनेच्या असलेल्या स्टेजमधून ऍम्प्लिफायरसह स्पीकर तसेच स्पॉट लाईट असा एकूण ३३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात शनिवार, ३ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शालीनी नगरात श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणच्या स्टेजमधून १३ हजार ८०० रुपयांचे एम्प्लीफायर, १० हजार रुपये किंमतीचे स्पीकर, ७ हजार रुपयांचे दोन स्पॉट लाईट असा एकूण ३३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे १ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आले. सर्वत्र शोध घेवून वस्तू मिळून न आल्याने मंडळाचे विवेक सुरेश सोनार यांनी शनिवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. नितेश ऊर्फ गोल्या मिलिंद जाधव, राकेश मिलिंद जाधव व परेश शांताराम कोळी सर्व रा. पिंप्राळा या तीन जणांनी वस्तू चोरुन नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला त्यानुसार शनिवारी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण हे करीत आहेत.

Exit mobile version