Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेश कॉलनीतून तरूणाची दुचाकी लांबविली; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका तरूणाची घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, रोहन गजानन पजई (वय-२७) रा. वैष्णवी कॉलनी आकोला ह.मु. गणेश कॉलनी जळगाव यांच्याकडे (एमएच ३० एएस ४५६४) क्रमांकाची दुचाकी आहे. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता कामावरून येवून घरसमोर दुचाकी पार्किंग करून लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आली. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोध घेतला असता मिळून आली नाही. जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून सविस्तर माहिती दिली. रोहन पजई यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहे. 

Exit mobile version