Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेशमूर्ती’ शासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणी विसर्जित करा : नगराध्यक्ष पवार यांचे आवाहन

 

पारोळा, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी श्रीगणेशाचे विसर्जन हे व्यक्तिगत न करता शासनाने संकलन केंद्रे ठरवून दिलेले आहेत त्याच ठिकाणी अकराव्या दिवशी विसर्जित करावे असे आवाहन नगराध्यक्ष करण पवार यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्ती ११ व्या दिवशी (ता. १) सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ३ वाजेदरम्यान संकलन केंद्रावर जावून विसर्जित करावे. गणेशमूर्तीचे ठरवून दिलेल्या ठिकाणी संकलन होणार असून तेथून नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन च्या मदतीने संकलित केलेल्या श्री गणेशमूर्तीचे पुरोहिता(ब्राह्मण) मार्फत पूजा व आरती करून शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार आहेत नगरपालिकेच्या वतीने सर्व व्यवस्था संकलन केंद्रांवर करण्यात आली आहे. नगराध्यक्ष करण पाटील व उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड ,सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी आवाहन केले आहे.

अशी आहेत संकलन केंद्रे
शहरातील संकलन केंद्र सहजयोग ध्यान केंद्र ,(डी डी नगर,) बोहरा स्कुल(डी डी नगर)स्वामी समर्थ केंद्र(सानेगुरुजी कॉलनी)आझाद चौक,कजगाव चैफुली(डाँ. बाबासाहेब पुतळा जवळ)पोस्ट आफिस(तांबे नगर)अमळनेर चैफुली (सागर ट्रेडेर्स जवळ) कासार गणपती चौक, नगरपालिका चौक, गोडबोले गल्ली, ओतार गल्ली,भाटे वाडी,गुजराथी गल्ली(दोस्त गणेश मंडळ जवळ) याठिकाणी श्री गणेश मूर्तीचे संकलन करण्यात येणार आहे.

Exit mobile version