Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गड-किल्ल्यांवर मद्यपानाला बंदी; गृहमंत्रालयाने काढला अध्यादेश

raigad

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर मद्यपान करण्यास राज्य शासनाने बंदी घातली असून याबाबतचा अध्यादेश गृह मंत्रालयाने काढला आहे.

महाराष्ट्रात सुमारे ३५० गड-किल्ले असून त्यांचे पावित्र्य राखण्यासाठी राज्य शासनाने इथं मद्यपान बंदी लागू केली आहे. अध्यादेशाद्वारे किल्ल्यांवर मद्यमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेश दिले आहेत. या अध्यादेशानुसार, अशा प्रकारे किल्ल्यांवर पहिल्यांदाच कोणी मद्यपान करताना आढळल्यास त्याला महाराष्ट्र दारुबंदी अभियान १९४९ च्या कलम ८५ नुसार १०,००० रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तर दुसर्‍यांदा असा गुन्हा झाल्यास त्याला एका वर्षाचा तुरुंगवास आणि १०,००० रुपयांचा दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर मद्यपानास सक्त मनाई आहे असे इशारा फलक लावण्याचे आदेशही गृहमंत्रालयाकडून प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Exit mobile version