Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गडकरींनी वर्ध्यातील कंपनीला मिळवून दिला रेमडेसिव्हीरच्या उत्पादनाचा परवाना

 

 

वर्धा : वृत्तसंस्था । राज्यात एकीकडे कोरोनावर प्रभावी रेमडेसिव्हीर औषधाचा तुटवडा आहे. दुसरीकडे वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शन निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. दरदिवशी 30 हजार इंजेक्शन बनवण्याचे लक्ष्य आहे. वर्ध्यातील या कंपनीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परवाना मिळवून दिला आहे.

 

वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स कंपनीमध्ये आजपासून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्मिती करण्यात येणार आहे. नितीन गडकरी यांनी वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, खासदार रामदास तडस उपस्थित होते.

जेनेटिक सायन्स लॅब कंपनीचे संचालक डॉ.महेंद्र क्षीरसागर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.  हैदराबाद येथील हेट्रा कंपनीकडून सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफसायन्सला उसणवार तत्वावर निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे.

 

. कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन मिळाली होती.

Exit mobile version