Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘माझी वसुंधरा’ अभियानाबाबत जनजागृतीस ‘चिनावल’ येथून होणार प्रारंभ

रावेर प्रतिनिधी ।   पृथ्वी, वायु, अग्नी, आकाश आणि जल यांची जन-जागृती करण्यासाठी शासनाकडून येत्या काही दिवसात “माझी वसुंधरा” हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी शासनाने रावेर तालुक्यातील चिनावल या गावाची निवड केली असून या अभियानाची माहीती देण्यासाठी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी गावात एक महत्वाची बैठक घेतली.

बैठकीत गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी सांगितले की, ग्रामपंचायतस्तरावर “माझी वसुंधरा” हे निसर्गाशी संबधित पंचतत्वा संदर्भात जन- जागृती गावात करावी यासाठी शासनाने पंधराशे गुण निश्चित केले आहे. या योजनेवर आपल्या ग्राम पंचायतने चांगले काम केल्यास जिल्हा किंवा विभागीय राज्यस्तरीय बक्षीस आपल्या गावाला मिळु शकतो यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने या “माझी वसुंधरा” अभियानावर काम करण्याचे आवहान दिपाली कोतवाल यांनी केले

बैठकीला यांची होती उपस्थिती

“माझी वसुंधरा” अभियाना संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीला पंचायत समिती सदस्य माधुरी, नेमाडे सरपंच भावना बोरोवले, विस्तार अधिकारी डी. एस. सोनवणे ड़ी. बी. सदांशु, ग्रामसेवक ए. टी. पाटील आदी पंचायत समितीचे व ग्राम पंचायतचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

असे आहे “माझी वसुंधरा” अभियान

हे अभियान दि २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत राबवली जाणार असून पृथ्वी, वायु, अग्नी , आकाश आणि जल यांची जन-जागृती तसेच चांगले काम करणा-या गावाला ५ जून पर्यावरण दिनी शासनाकडून पारीतोषित देण्यात येणार आहे.

Exit mobile version