Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गजानन कॉलनीतून एकाची दुचाकी लांबविली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गजानन कॉलनी परिसरातून तरूणाची ११ हजार रूपये किंमतीचे दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, प्रशांत गुलाब पाटील (वय-३२) रा. पारोळा जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अमळनेर शहरात खासगी क्लास चालवून आपला उदरनिर्वाह करत असतो. शनिवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता प्रशांत हा त्याची दुचाकी (एमएच १९ सीटी ९०४६) ने अमळनेर शहरातील गजानन कॉलनीत असलेले क्लासेसमध्ये आला. त्यावेळी त्याने त्याची दुचाकी क्लासेस समोर पार्किंगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ११ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर सोमवारी ९ जानेवारी रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बापू साळुंखे करीत आहे.

Exit mobile version