Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गंभीर गुन्ह्यातील आरोपीला प्रतिबंधात्मक कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घरफोडी व सरकारी नोकराव हल्ला यासह ११ गंभीर गुन्हे दाखल असलेला समीर हनीफ काकर (वय-२०, बिसमिल्ला चौक, तांबापुरा) याला स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी १ मार्च रेाजी दुपारी काढले. त्याची नागपुर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सीर काकर याच्याविरुद्ध ११ विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्याला वेळोवेळी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. परंतु न्यायालयातून जामीनावर सुटल्यानंतर तो सराईतपणे गुन्हे करीत होता. तसेच आपल्यासोबत असलेल्या गुंडासोबत घातक शस्त्रे ठेवून नागरिकांवर दहशत निर्माण करीत होता. त्यामुळे त्याला कायद्याचा देखील अजिबात धााक राहिलेला नसल्याने सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षतेची भावना तयार झाली होती. त्यामुळे त्याच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दि. २ ङ्गेब्रुवारी रोजी समीर काकरचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर केला होता.

पोलीस अधीक्षकांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर जिल्हाधिकार्‍यांनी स्वाक्षरी केल्यानंतर समीर काकरला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सङ्गौ युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, नितीन पाटील, सचिन पाटील, इम्रान सैय्यद, इम्रान बेग यांच्या पथकाने काकरला ताब्यात घेवून त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी केली आहे.

Exit mobile version