Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गंगापुरी येथील तरूणीचा नदीत बुडून मृत्यू

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गंगापूर येथील सुर नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या तरूणीचा पाय घसरून पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी जामनेर पोलीसात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील गंगापुरी येथील तरूणी सोनाली दिलीप गायकवाड (वय-१८) ही वाघुर धरणाच्या बॅकवॉटर असलेले सुर नदीत आज सकाळी ७ वाजता कपडे धुण्यासाठी गेली होती. धुणं धुत असतांना पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मयत सोनाली गायकवाड यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. जामनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Exit mobile version