Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खोटेनगर जवळील अपघातप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खोटेनगर स्टॉपवर पुढे चालत असलेल्या ट्रकला मागून दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक देवून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रकचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खोटे नगर जवळ बुधवार २७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आयशस क्रमांक (एमएच १८ बीजी ४८००) ही जळगावकडून धुळ्याकडे जात असतांना वरील चालक परवेज खान हासीन खान (वय-३९) रा. खरगोन मध्यप्रदेश याने परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून पुढे चालत असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक‍ दिली. या अपघातात परवेज खान हासीन खान हा जखमी झाला. तर वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुरूवार २८ जुलै रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने करीत आहे.

Exit mobile version