Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खोटेनगरातील वृध्दाची फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खरेदी केलेले घरात लिव ऍन्ड लायसनन्स करारनामा करुन राहणार्‍या कुटुंबाने खोटे दस्ताऐवजावर खोटी सही करुन जळगाव शहरातील वृध्दाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवार ७ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

खोटे नगरजवळील दिव्य जीवन वाटीका आश्रमजवळ संदीप शिवराम गुजर हे वृद्ध वास्तव्यास आहे. गुजर यांच्या महाबळ शिवारातील घराचा खरेदीविक्रीचा व्यवहार झाला होता.  अनिरूध्द कृष्णराव कुळकर्णी यांच्याकडून गुजर यांनी घर खरेदी केले होते. त्यानंतर गुजर यांनी हेच घर अमित सुरेंद्र भाटीया यांना विक्री केले होते. मात्र घराची विक्री झाल्यावर देखील घराचे पुर्वीचे मालक अनिरूध्द कुळकर्णी हेच राहत होते. घर खाली करण्याबाबत घराचे नवीन मालक भाटीया यांनी अनिरूध्द कृष्णराव कुळकर्णी यांना नोटीस दिली होती. मात्र यानंतरही कुळकर्णी यांनी घर खाली केले नाही. व याच घरावर बांधकाम केले. घर ताब्यात मिळावे म्हणून भाटीया यांनी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयात या दाव्याची सुनावणी सुरू असून या सुनावणी दरम्यान, कुळकर्णी यांनी न्यायालयात करारनामा सादर केला.

 

न्यायालयात सादर केलेला करारनामा खोटा व बनावट असून त्यावर संदीप गुजर यांची स्वाक्षरी देखील बनावट असल्याचे समोर आले.   आपली फसवणुक झाल्याची खात्री झाल्यावर संदीप गुजर यांनी रविवारी ७ मे रोजी दुपारी  रात्री शहर पोलीसात धाव घेत तक्रार दिली.  संगनमत करुन खोटा दस्ताऐवजाावर खोट्या स्वाक्षरी करुन न्यायालयात सादर करुन फसवणूक केल्याप्रकरणी अनिरुद्ध कृष्णराव कुलकर्णी, सुभद्रा अनिरुद्ध कुलकर्णी, अनिकेत अनिरुद्ध कुलकर्णी तिघ रा. शारदा कॉलनी, मिलिंद नारायण सोनवणे रा. नुतनवर्षा कॉलनी महाबळ, मंगल चंपालाल पाटील, ए. पी. बावस्कर, रा. शेगाव ता. जि. बुलढाणा यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.

Exit mobile version