Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खेलो इंडिया स्पर्धेत जैन अकॅडमीच्या तिघांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ४ थ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील, सोनल हटकर व मनिषा हटकर या तिघांची तांत्रिक अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे.

 

पंचकुला हरियाणा येथे जून २०२२ मध्ये १८ वर्षातील वयोगटासाठी ४ थ्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे.  बास्केटबॉल या खेळाचे आयोजन दिनांक ७ ते १४ जून २०२२ दरम्यान करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी जैन स्पोर्टस अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर), खेळाडू मनिषा हटकर व मूळजी जेठा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्सची खेळाडू सोनल हटकर अशा तिघांची बास्केटबॉल या खेळासाठी तांत्रिक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही या तिघांची विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच व तांत्रिक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. वाल्मिक पाटील, मनिषा हटकर व सोनल हटकर यांच्या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल अॅॅडहॉक कमिटीचे सचिव शत्रुघ्न गोखले व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांना बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव चंद्रमुखी शर्मा यांच्या वतीने देण्यात आले. वाल्मिकसह सोनल व मनिषा यांच्या नियुक्तीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, क्रिडा समन्वयक अरविंद देशपांडे, फारुक शेख, रवींद्र धर्माधिकारी, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.बी. देशमुख, क्रीडा शिक्षक सुभाष वानखेडे, मूळजी जेठा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, क्रीडाशिक्षक श्रीकृष्ण बेलुरकर, निलेश जोशी, प्रवीण कोल्हे, रणजीत पाटील, लाॅर्ड गणेशा स्कूल जामनेरचे प्रिन्सिपल श्री. सिंग सर, व्यवस्थापक सतीश मोरे, जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल संघटना व सर्व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले.

Exit mobile version