Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खेडी-भोकरी ते भोकर पुलाच्या जागेची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

चोपडा प्रतिनिधी । खेडी भोकरी ते भोकर दरम्यान उभारण्यात येणार्‍या नियोजित पुलाच्या जागेची पाहणी आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली.

राज्य महामार्ग ४० वरील खेडी-भोकरी-भोकर पुलाच्या बांधकामा विषयी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दि ३० जानेवारी २०२०रोजी नाशिक येथील प्रादेशिक आढावा बैठकीत प्रश्‍न मांडला होता. त्या विषयांकीत प्रश्‍नावर उध्दव ठाकरे, यांनी खेडी-भोकरी–भोकर पुलाचे लवकरात लवकर काम चालू करण्याचे आदेश संबंधित विभागाना दिले होते. या अनुषंगाने दिवाळीच्या आत पुलाचे काम चालू करण्यासाठी बांधकामाकरीता करावयाच्या सर्वेक्षण,भूगर्भ अन्वेषण इ.कामाकरीता खेडी-भोकरी-भोकर तापी नदीच्या पात्रात
आज दिनांक ६ जून रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली. याप्रसंगी चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे,माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह व्ही. डी. पाटील (माजी माहीती आयुक्त), प्रशांत सोनवणे (अधिक्षक अभियंता सा.बां विभाग)सौ.रजनी देशमुख (कार्यकारी अभियंता निम्न तापी प्रकल्प)श्री. सुभाण राऊत (उपविभागीय अभियंता सा बां); व्ही एस पाटील (उपविभागीय अभियंता निम्न तापी ); पवन चौरे (शाखा अभियंता निम्न तापी प्रकल्प); गोपाल फकीरचंद पाटील, राजेंद्र चव्हाण, भरत बावीसकर पं स सदस्य, सुकलाल भाऊ कोळी, सुनील पाटील, अरूण कोळी तसेच खेडी-भोकरी-भोकर परिसरातील ग्रामस्थ, शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version