Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खेडी बुद्रुक येथील विवाहितेचा पैशांसाठी छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या खेडी बुद्रुक येथील माहेर असलेल्या २२ वर्षीय विवाहितेला पैशांसाठी मानसिक, शारीरिक छळ करून गांजपाठ केला. याबाबत पतीसह सासु-सासरे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी बुद्रुक येथील विनायक नगरातील माहेर असलेल्या रोशनी आकाश इंगळे (वय-२२) यांचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील माळेगाव येथील आकाश मनोहर इंगळे यांच्याशी रीतीरीवाजा नुसार जुलै-२०१९ मध्ये झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले. त्यांच्या पदरी दीड वर्षाचा मुलगा असं काही सर्व चांगले असताना पती आकाश इंगळे याने विवाहितेला माहेरहून ५० हजार रुपये आणावे, अशी मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही, याचा राग आल्याने पती आकाश इंगळे हिने याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच दमदाटी करून मानसिक व शारीरिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. याबाबत शनिवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता पती आकाश मनोहर इंगळे, सासू बेबाबाई मनोहर इंगळे आणि सासरे मनोहर नारायण इंगळे सर्व रा. माळेगाव जि. बुलढाणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील सोनार करीत आहे.

Exit mobile version