Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खूनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी जेरबंद; भुसावळ बाजारपेठ पोलीसांची कामगिरी

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील मनियार कॉलनीतील एका तरूणाला चाकूसह लोखंडी रॉडने मारहाण करून सहा महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला बाजारपेठ पोलीसांनी मुस्लिम कॉलनीतून अटक केली आहे. बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, फिर्यादी शेख नाजीन शेख नासिर रा. माणियार कॉलनी, भुसावळ याला १६ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १० वाजता संशयित आरोपी शेख अबरार शेख समोसोद्दिन (वय-२५) रा. माणियार कॉलनी जळगाव याने विटा टाकण्याच्या कारणावरून चाकूने वार केले तर लोखंडी रॉड आणि लाकडी रॉड यांना जीवे ठार मारण्याची धमकीदिली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित आरोपी हा फरार होता. दरम्यान शुक्रवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० संशयित आरोपी शेख अबरार हा शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी मिळाली. त्यानुसार त्याला पोलीसांनी अटक केली.  

यांनी केली कारवाई

पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवाएसपी सोमनाथ वाघचौरे, स.पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या सुचनेनुसार  सपोनि अनिल मोरे, पो.कॉ. सुनील जोशी, पोना रमण सुरळकर, उमाकांत पाटील, किशोर महाजन, पोका विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, कृष्णा देशमुख, पोहेका चालक अयाझ सय्यद अशानी केली आहे.

Exit mobile version