Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयिताच्या मुसक्या आवळल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खूनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपाळपूरा भागातून अटक करण्यात यश आले आहे. त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विजयसिंग फुलसिंग पारधी (वय-४४) रा. जैनाबाद, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, खूनाच्या गुन्ह्यातील फरार असलेला संशयित आरोपी हा शहरातील गोपाळपूरा भागाकडून जैनाबाद परिसरात येत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पोना. विजय पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, प्रितम पाटील सचिन महाजन, ईश्वर पाटील यांनी मंगळवारी ३ जानेवारी रोजी दुपारी सापळा रचून संशयित आरोपी विजयसिंग फुलसिंग पारधी याला ताब्यात घेतले. त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल असल्याने पुढील कारवाईसाठी शहर पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले.

Exit mobile version