Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खुबीचंद साहित्या हल्ला प्रकरण: पाच संशयितांचा जमीन फेटाळला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणातील आत्तापर्यंत पाच संशयितांना अटक करण्यात आली असून या संशयितांचे अंतरीम जामीन न्यायालयाने आज फेटाळले.

अशी आहे घटना
याबाबत माहिती अशी की, साहित्या यांच्या मुलाच्या नावावर असलेली महागडी चारचाकी त्यांनी माजी महापौर ललित कोल्हे यांना दिली होती. ही चारचाकी परत मागीतल्यानंतर कोल्हे यांनी देण्यास टाळाटाळ केली. तसेच साहित्या यांच्याकडून खंडणी मागीतली होती. १६ जानेवारी २०२० रोजी रात्री ८.३० वाजता शहरातील गोरजाबाई जीनखाना येथे साहित्या गेले होते. यावेळी ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. पिस्तुलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण केली. यात साहित्या हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. साहित्या यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पाेलिस ठाण्यात माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांवर प्राणघातक हल्ला, बेकायदेशीर जबरदस्तीने वसुली, लबाडीच्या इराद्याने वस्तुची परस्पर विक्री, गैरकायद्याची मंडळी गोळा करुन मारहाण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी व बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पाच जणांना झाली अटक:
या गुन्ह्यात आत्तापर्यंत भाजप नगरसेवक प्रवीण कोल्हे, नरेश अग्रीया, राकेश अग्रीया, गणेश बाविस्कर व आणखी एक अशा या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व संशयित सध्या कारागृहात आहेत. दरम्यान, पाचही जणांनी अंतरीम जामीनासाठी अर्ज केले होते. त्यावर न्यायाधिश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरीन्सींगने युक्तीवाद झाले. युक्तीवादाअंती न्यायालयाने पाचही जणांचे जामीन फेटाळले. सरकारपक्षातर्फे अॅड.केतन ढाके यांनी काम पाहिले.

Exit mobile version