Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त एनएसयुआयतर्फे अन्नदान

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त एनएसयुआयच्या वतीने शहरातील गोरगरीब गरजवंतांना अन्नदान व न्याय किटचे वाटप करण्यात आले.

खासदार राहुल गांधी यांनी देशातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करता कोवीड योद्धांचा म्हणजेच पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्से, सफाई कामगार, पत्रकार की ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता देशातील व राज्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे व मदतीचे कार्य केले अशा सर्व लोकांचा सन्मान करणे, तसेच मनरेगामध्ये जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळवून द्यावा यासारख्या देश हिताच्या गोष्टींवर ती खर्च करावा अशा प्रकारचे आव्हान राहुल गांधी यांनी केले होते. त्यालाच अनुसरून जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील रेल्वेस्थानकाजवळ २०० गोरगरीब गरजवंतांना अन्नदान व न्याय किट वाटप करून सहकार्य करण्याचा प्रयत्न केला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अनुसूचित जाती जमाती विभाग अध्यक्ष मनोज सोनवणे, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, रेशनिंग कमिटीचे अध्यक्ष वासुदेव महाजन, मनोज चौधरी, उद्धव वाणी, प्रल्हाद सोनवणे, जमील शेख, योगिता शुक्ला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version