Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खा.उन्मेष पाटलांनी घेतली नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमाची माहिती

 

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या युवा एवं खेळ मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावकडून विविध उपक्रम राबविले जातात. मंगळवारी खा.उन्मेष पाटील जळगावला आले असताना जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी नेहरू युवा केंद्राच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

 

नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे ३५ स्वयंसेवकांच्या माध्यमातून जिल्हाभर विविध उपक्रम राबविले जातात. कोरोना हद्दपार करण्यासाठी नेहरू युवा केंद्रातर्फे जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यात वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून होमिओपॅथी औषधींचे पॅकिंग केले जात असून त्याठिकाणी देखील नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक सेवा देत आहे. मंगळवारी जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा.उन्मेष पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांनी नेहरू युवा केंद्राच्या कार्याची माहिती जाणून घेतली. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी त्यांना भविष्यात राबवायच्या उपक्रमांची माहिती दिली तसेच युवक प्रतिनिधी चेतन वाणी यांनी सध्या सुरू असलेल्या उपक्रमांविषयी सांगितले. यावेळी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पाटील, नेहरू युवा केंद्राचे लेखापाल अजिंक्य गवळी, नाना सोनवणे, भूषण लाडवंजारी आदी उपस्थित होते.

 

खा.उन्मेष पाटील यांनी नेहरू युवा केंद्राच्या कार्याचे कौतुक करून भविष्यात काहीतरी नावीन्यपूर्ण आणि आगळावेगळा उपक्रम राबविण्याबाबत लवकरच बैठक घेण्याविषयी चर्चा केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून केलेल्या कार्याला यावेळी खा.उन्मेष पाटील यांनी उजाळा दिला. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहरू युवा केंद्र एक उत्तम व्यासपीठ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जळगावच्या उपक्रमांची माहिती जाणून घेतल्याने समन्वयक नरेंद्र यांनी खा.पाटील यांचे आभार मानले.

Exit mobile version