Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खासदार संजय राऊत राष्ट्रवादीच्या वाटेवर : नितेश राणे यांचा दावा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेते नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

 

आज नितेश राणे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचं खरं नाही. त्यांचा पक्ष राहिला नाही. उद्धव ठाकरे मला खासदार करणार नाही. मला उद्धव ठाकरेंसोबत राहण्यात अर्थ राहिला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश द्या, असं राऊत यांनी राष्ट्रवादीला कळवलं आहे, असे प्रतिपादन नितेश राणे यांनी याप्रसंगी केले.

 

राणे पुढे म्हणाले की, शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय परत घेतला. तेव्हा राऊत यांना पवारांच्या व्यासपीठावर बसायचं होतं. त्यामुळे राऊत सकाळपासून पवारांच्या संपर्कात होते. पण संपर्क होत नव्हता. त्यामुळे राऊत दुपारी ४ वाजता राऊत सिल्व्हर ओकला गेले असा सावा राणे यांनी केला. तर, राऊत साप आहेत. तुम्ही सापाला दूध पाजत होता. तो बाळासाहेबांचा झाला नाही. तो तुमचा होऊ शकणार नाही. हे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतोय, असंही ते म्हणाले. राऊतांनी ठाकरे यांच्या घरात भांडणं लावली. आता राष्ट्रवादीत गेल्यावर उद्धव ठाकरेंना चित्र स्पष्ट होईल. एका माणसामुळे पक्ष फुटला हे त्यांना कळेल, असंही ते म्हणाले.

Exit mobile version