Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खासदार नवनीत राणा हॉस्पिटलमध्ये दाखल !

अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 

जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु आहेत. खासदार नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील १२ जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. सुरुवातीला रवी राणा यांच्या वडिलांनंतर मातोश्री, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण सात सदस्यांना लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या दोन्ही मुलांनाही संसर्ग झाल्याचे समजले. तर त्या पाठोपाठ आमदार रवी राणाही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. राणा कुटुंबातील एकूण बारा सदस्य कोरोनाग्रस्त आहेत.

Exit mobile version