Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्यामुळे आमचे मानधन दुप्पट

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या वतीने  मेहुणबारे येथे  जळगाव जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्यामुळे आमचे मानधन दुप्पट झाले अशी कृतज्ञतेची भावना राज्य उपाध्यक्ष मधूकर पाटील यांनी व्यक्त केली.

 

आज मेहुणबारे (चाळीसगाव) पोलीस स्टेशनच्या आवारात जळगाव जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या वतीने राज्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच भैय्यासाहेब पाटील तर मेहुणबारे (चाळीसगाव) पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, पीएसआय प्रकाश चव्हाणके ,नूतन राज्य उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष हेमराज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, राज्य संघटक भाऊसाहेब पाटील, संघटनचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र शिंदे, बाजार समितीचे माजी सभापती मच्छिंद्र भाऊ राठोड ,पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष किशोर भदाणे, जिल्हा संघटक दीपक पाटील, चाळीसगाव तालुकाध्यक्ष जीवन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या वतीने  नूतन पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राज्य उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी प्रास्ताविक केले.  ते म्हणाले की,  पोलीस पाटील संघटनेचे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या बद्दल प्रचंड प्रेम आहे. आमचे मानधन दुप्पट होण्यासाठी तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार म्हणून उन्मेशदादा पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. त्यामूळे आमचे मानधन दुप्पट झालं याचा पूर्ण राज्य पोलीस पाटील संघटनेला अभिमान आहे. आज तुमच्या सर्वांचे सहकार्याने राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याने आमची जबाबदारी वाढली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या पोलीस पाटील संघटनेच्या मागण्या संदर्भात भक्कम पाठपुरावा करत आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी खासदार उन्मेशदादा पाटील  सतत प्रयत्नशील राहिल्याचे ते म्हणाले.  पी.एस.आय.प्रकाश चव्हाणके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर मधुकर पाटील यांनी आभार मानले. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील सर्व पोलीस पाटील बांधव उपस्थित होते.

 

Exit mobile version