Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खासदार असदुद्दीन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा द्या – एआयएमआयएमची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये हल्ला झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध करत खासदार ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी एआयएमआयएम जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना दिलेल्या निवेनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करा व बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर एआयएमआयएम जिल्हध्यक्ष अहमद शेख, महानगर अध्यक्ष सैय्यद दानिश, नगरसेवक हाजी युसूफ शेख जुबेर देशमुख, राशिद खान, अक्रम देशमुख यांची स्वाक्षरी आहे.

 

Exit mobile version