Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खासगी बाजार समितीतून परस्पर माल विकणाऱ्या मालकावर कारवाई करा (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । महावीर अॅग्रो जामनेर खाजगी बाजार समितीमध्ये माल मका, सोयाबीन व्यापारी व शेतकऱ्याचा माल परस्पर विकून टाकणारा गोडावून मालक ईश्वरलाल किसनलाल कोठारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय लहुशक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास आजपासून प्रारंभ केला आहे.

निवेदनाचा आशय असा की, नेरीदिगार येथील साईनाथ ट्रेडर्सचे सुनिल दामु गुजर यांनी शेतकऱ्यांचा माल मका ११९४८ क्विंटल व सोयाबीन १२२५ क्विंटल एवढा माल जामनेर येथील ईश्वरलाल किसनलाल कोठारी यांच्या वाकडी शिवारात असलेल्या खाजगी गोडावून मध्ये ठेवला होता. या मालाचे वजन याच खाजगी गोडावून येथे करण्यात येऊन याबाबत वजन पावत्या त्यांनी स्वहस्ताक्षरता लिहून दिल्या. सुनिल गुजर हे लॉकडाऊन काळात आजारी असल्याने भाड्याचे व व्याजाचे पैसे कोठारी यांना देऊ शकले नाहीत. मात्र, याकालावधीत सुनिल गुजर हे मयत झाल्याचे कोणीतरी गोडावून मालक श्री. कोठारी यांना सांगितले. याची शाहनिशा न करता श्री. कोठारी यांनी सुनिल गुजर यांचा माल परस्पर विकून टाकला. याबाबत श्री. गुजर यांनी फोनद्वारे विचारणा केली असता मका व सोयाबीनची परस्पर बाजारात विक्री केल्याचे समोर आले असून श्री. कोठारी यांनी हे माल ठेवला असल्याचे नाकबूल करत आहेत. यामुळे श्री. गुजर शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात व्हिडीओ रेकोर्डिंग, हस्तलिखित लिहिलेला हिशोब, काट्यांच्या गाड्यांचा पावत्या आहेत. माल गोडावूनमध्ये ठेवून परस्पर विक्री करून फसवणूक केल्याने गोडावून मालक ईश्वरलाल किसनलाल कोठारी, सुरेश किसनलाल कोठारी, प्रमोद ईश्वरलाल कोठारी, विनय प्रकाशचंद कोठारी, प्रकाश किसनलाल कोठारी यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत यामागणीसाठी राष्ट्रीय लघूशक्तीतर्फे आमरण उपोषण करण्यात येत आहे. उपोषणाला खान्देश विभाग अध्यक्ष रमेश कांबळे, उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव, व्यापारी सुनिल गुजर, कैलास सोनवणे, सागर अंभोरे, सतीश गायकवाड आदी उपस्थित आहेत.

 

Exit mobile version