Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खामगाव टपाल कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय टपाल कार्यालयात महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

बुधवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध पद्धतीने हा जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. शासकीय कार्यालय खाजगी कार्यालय किंवा इतर संस्था ज्यामध्ये दररोज महिला या कार्यरत असतात. आपले सेवा त्या उपक्रमांना देत असतात त्यांना आज गौरवण्यात आले.

 

खामगाव येथील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून खामगाव पोस्ट ऑफिस चे पोस्टमास्तर चंद्रकांत शुक्ला यांनी खामगाव पोस्ट ऑफिस अंतर्गत येणाऱ्या महिला कर्मचारी तसेच पोस्ट ऑफिस एजंट म्हणून आपली सेवा देणाऱ्या महिला यांना सकाळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .व त्यांचा कार्याचा गौरव केला. यावेळी खामगाव पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर चंद्रकांत शुक्ला, सहाय्यक पोस्ट मास्तर विनायक हिवराळे, यांच्या  उपस्थितीत सहाय्यक पोस्ट मास्तर श्रीमती भारती मनतकार, व कर्मचारी कु.रेशमा भोपळे ,प्रियंका पाटील ,सोनू वाघ, दिपाली राहणे, दिपाली देवकर इतर महिला कर्मचारी यांचा कार्यालयामध्ये यथोचित पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आल. खामगाव पोस्ट ऑफिस चे पोस्ट मास्तर चंद्रकांत शुक्ला यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Exit mobile version