Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली ; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

खामगाव,  प्रतिनिधी । शहरातील नांदुरा रोडवरील दोन मेडिकल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ लाखाची रोकड लंपास केल्याची घटना आज २२ जून रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली़. दररोज रात्री ११  वाजेनंतर पथदिवे बंद होत असल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी हाथ साफ  केला आहे़.

 

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार नांदुरा रोडवरील तुळजाई हाँस्पीटल मधील डाँ. गौरव टिकार व देवेंद्र मालू यांच्या तुळजाई मेडिकलच्या शटरचे कुलुपाचा कोंडा कटरच्या साह्याने कापून दुकानातील सुमारे ८०  हजाराची रोकड लंपास केली़.  ही घटना सीसीटीव्ही कॅम्याऱ्यात कैद झाली आहे. चोरटे नांदुरा रोडकडून एका पांढया रंगाच्या तवेरा गाडीने आले होते. अंदाजे ४-५ संख्येत असलेल्या चोरट्यांजवळ एका थैलीत अवजारे व शस्त्रे होती़. घटनेदरम्यान हाँस्पीटलमध्ये झोपलेल्या कर्मचाऱ्यांना आवाज सुध्दा आला नाही आणि चोरटे आपले काम फत्ते करून निघून गेले.  तर दुसया घटनेत जलंब नाका भागातील डाँ. आशिष अग्रवाल यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलमधील मेडिकल दुकानाच्या शटरचे कुलुप कटरने कापले व दुकानातून सुमारे २  लाख ५०  हजाराची रोकड लंपास केली. सदर घटना सुध्दा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात   कैद झाली आहे़. दोन्ही ठिकाणी एकाच टोळीने चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़.  नांदुरावरील पथदिवे दररोज रात्री ११ वाजेनंतर बंद राहत असल्याने चोरट्यांचे आयतेच फावले आहे,तसेच अंधारामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात    कैद तवेरा गाडीची नंबर प्लेट दिसू शकत नाही़.  नांदुरा रोडवर बहुतांश बँका व व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.  नगर परिषद आर्थिक बचत करण्यासाठी रात्री पथदिवे बंद करीत आहे, तर दुसरीकडे काही भागात दिवसा सुध्दा पथदिवे सुरू राहतात़. एकंदरीत नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभाराचा मात्र नागरिकांना वरीलप्रकारे भुर्दंड सोसावा लागत आहे. पोलिस सुध्दा रात्रीची गस्त घालत नसल्यामुळे चोरट्यांना रान मोकळे झाल्याचा आरोप होत आहे़.

 

Exit mobile version